😱उद्यापासून टोलवसुली करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 19, 2020

😱उद्यापासून टोलवसुली करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश..


😱 उद्यापासून टोलवसुली करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीला स्थगिती देण्यात आली होती. पण टोलवसुली बंद केल्यामुळे सरकारच्या महसुलात घट होत आहे. त्यामुळे येत्या 20 एप्रिलपासून पुन्हा टोलवसुली करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र देशातील मालवाहतूकदारांच्या संघटनेने टोलवसुलीला कडाडून विरोध केला आहे.

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे कोणत्याही वाहनांवर सध्या टोल आकारण्यात येत नाही.

पण आता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व ट्रक व मालवाहतूक करणाऱया वाहनांना सर्व राज्यात टोलमधून सूट देण्यात आली. पण आता 20 एप्रिलपासून टोल वसुली पुन्हा सुरु करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाने जारी केले आहेत. टोलवसुली बंद असल्याने कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परिवहन उद्योगाचा विरोध
मात्र देशातल्या सुमारे 95 लाख ट्रक वाहतूकदारांचे प्रतिनिधित्व करणाऱया आँल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने या टोल वसुलीला विरोध केला आहे. या दिवसात टोल वसुली करणे अतिशय चुकीचे आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका असतानाही मालवाहतूकदारांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अव्याहत सुरू ठेवला आहे. या दिवसात वाहतूकदारांपुढेही अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करून माल वाहतूक सुरु ठेवली असतानाही टोल वसुली करणे चुकीचे असल्याचे मत या संघटनेने व्यक्त केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages