👌माणुसकीचा झरा; उंड्री-पिसोळी गावचे समाजसेवक श्री.राजेंद्र भिंताडे यांच्यातर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 4, 2020

👌माणुसकीचा झरा; उंड्री-पिसोळी गावचे समाजसेवक श्री.राजेंद्र भिंताडे यांच्यातर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप..


👌 माणुसकीचा झरा ; उंड्री-पिसोळी गावचे समाजसेवक श्री. राजेंद्र भिंताडे यांच्यातर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप..
करणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. यापरिस्थितीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने समाजाप्रती प्रत्येकाला काहीतरी देणे आहे ही सामाजिक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून उंड्री गावचे समाजसेवक श्री.राजेंद्रभाऊ भिंताडे यांनी पैशाअभावी भुकेने व्याकूळ झालेल्या गरजवंतांना ५ किलो उच्च प्रतीचा तांदूळ, १ किलो तूरडाळ, २ किलो कांदे, २ किलो बटाटा, १ लिटर खाद्यतेल असे अन्नधान्याचे वाटप केले आहे. या अडचणीच्या काळात गरजवंत लोकांसाठी समाजसेवक श्री.राजेंद्रभाऊ भिंताडे हे एक आधार ठरले आहेत.
उंड्री गावचे समाजसेवक श्री.राजेंद्र भाऊ भिंताडे यांना पैशाअभावी भुकेने व्याकूळ झालेले काही लोक दिसताच त्यांनी या गरजवंतांना मदत करण्याची कल्पना मनात घेऊन त्यांनी घरी येताच पत्नी समाजसेविका सौ. रेणुका भिंताडे, शेतकरी समाजसेवक वडील श्री. काशिनाथ भिंताडे आई - समाजसेविका आईमाता गौरविंत सौ. मंदाकिनी भिंताडे यांना विचारून मदत करण्याचे ठरविले कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ होकार दिल्याने समाजसेवक श्री.राजेंद्र भाऊ भिंताडे यांनी दुकानातून तांदूळ, तुरदाळ, बटाटे, कांदा, खाद्यतेल विकत घेऊन घरी आणून कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, दोन किलो बटाटा, दोन किलो कांदा, एक लिटर खाद्यतेलाचे पाकिटे तयार करून उंड्री-पिसोळी येथील प्रत्येक गरजवंतांना अन्नधान्य देताना 'कोरोना'चा प्रादुर्भाव होऊ नये ही खबरदारी घेऊन वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे गरजवंतांना पुढील १५ दिवसापर्यंतची अन्नधान्याची सोय झाली आहे.
"चला गरजवंतांना अडचणीच्या काळात हात देऊन गोरगरिबांना साथ देऊ" ही भावना जपत सामाजिक कार्याचा एक आदर्श समाजसेवक श्री.राजेंद्रभाऊ भिंताडे यांनी घडवला आहे. "असाच प्रकारे शेकडो मदतीचा हात पुढे येऊन सामाजिक कर्तव्य पार पाडत माणुसकी जपावी" अशी भावना उंड्री पिसोळीचे मंडलअधिकारी श्री. व्यंकटेश चीरमुल्ला यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
संचारबंदीमुळे अनेक कुटुंबाची आर्थिक गणितं बिघडली आहेत सरकारी मदत येईपर्यंत रोजंदारी करणाऱ्या कुटुंबांचे हाल होऊ नयेत यासाठी या काळात गरज व त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्याची खरी गरज आहे. म्हणून मी हे पाऊल उचलले. मात्र मदत करत असताना शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लागू केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. शिवाय येथील सर्व कुटुंबांना सूचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे समाजसेवक श्री. राजेंद्रभाऊ भिंताडे यांनी सांगितले आहे.

यावेळी, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, उंड्री-पिसोळी मंडलअधिकारी श्री. व्यंकटेश चीरमुल्ला, उंड्री गावचे तलाठी श्री. शिवाजीराव देशमुख, ऊरळी देवाची गावचे तलाठी श्री. श्रीकृष्ण शिरसाट, उपसभापती सौ. शारदाताई होले, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. स्वाती टकले, उंड्री गावचे कोतवाल श्री. रवी घुले, उंड्री गावचे सरपंच श्री. उत्तम फुलावरे, उंड्री गावचे उपसरपंच श्री. वसंतराव कड, माजी उंड्री गावचे उपसरपंच श्री. तानाजी कड, पिसोळी गावचे सरपंच श्री. मच्छिंद्र दगडे या मान्यवरांच्या हस्ते गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत सदस्य - श्री. सुभाष घुले , श्री. सचिन पुणेकर, श्री. गणेश पुणेकर, सौ. जयश्री पुणेकर, सौ. गौरीताई फुलारे, सौ. भाग्यश्री कदम , सौ. माया कामठे, सौ. ललिता कामठे, श्री. गणेश कानडे, श्री. शिवलिंग कानडे.
सामाजिक कार्यकर्ते - श्री. जालिंदर कामठे, श्री. विशाल कामठे, श्री. मोहन कामठे, श्री. उत्तम कामठे, श्री. अमोल कामठे, श्री. अविनाश टकले, श्री. आकाश टकले, श्री. कैलास पुणेकर, श्री. सुनील पुणेक, श्री. शशीकांत पुणेकर, श्री. प्रवीण पुणेकर, श्री. मनोहर पुणेकर, श्री. ज्ञानेश्वर पुणेकर, श्री. पुंडलिक पुणेकर, श्री. दत्तोबा होले, श्री. ओमकार होले, श्री. भानुदास होले, श्री. हनुमंत घुले, श्री. दादासाहेब कड, श्री. प्रफुल्ल कदम, श्री. देवदास बांदल, श्री. संतोष पुरवंत, श्री. दीपक पुरवंत, श्री. तात्या पठारे, श्री. संतोष मुळीक, श्री. अनंत वाडेकर, श्री. विठ्ठल भिंताडे, श्री. राहुल भिंताडे, श्री. निलेश भिंताडे, श्री. लालचंद भिंताडे, श्री. सचिन भिंताडे, श्री. रणवीर भिंताडे, श्री. राजवीर भिंताडे, श्री. योगेश भिंताडे , श्री. भानुदास भिंताडे, श्री. सुहास भिंताडे, श्री. शेखर भिंताडे, श्री. अरुण भिंताडे, श्री. दिलीप भिंताडे यांच्या मदतीने व समस्त भिंताडे परिवार आणि उंड्री गावच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने उंड्री-पिसोळी येथील गरजवंतांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages