😱 तबलिगी जमातीमधील लोकांनी चेक पोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीसांची तातडीने तपासणी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 6, 2020

😱 तबलिगी जमातीमधील लोकांनी चेक पोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीसांची तातडीने तपासणी..


😱 तबलिगी जमातीमधील लोकांनी चेक पोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीसांची तातडीने तपासणी..

लातूर येथे तबलिगी जमातीमध्ये सहभागी झालेले आठ कोरोनाग्रस्त रुग्ण शहागडजवळ लातूरकडे जाण्यासाठी बीडच्या चेक पोस्टवर अडवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांनी बीड पोलिसांशी हुज्जत घातली होती. आता सदर चेक पोस्टवर कर्तव्यात असलेल्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने तपासणी केली जात आहे

तबलिगी जमातीमध्ये सहभागी झालेल्या आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लातूरमध्ये उघड झाले. हे कोरोनाग्रस्त नागरिक जालन्याहून लातूरकडे रवाना होत असताना त्या रात्री शहागडच्या चेक पोस्टवर बीडच्या पोलिसांनी त्यांना अडवले. जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली. बीडचे पोलीस लातूरकडे जाऊ देत नसल्याने त्यांनी चेक पोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातली. तरीही पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. अखेर त्यांनी शहागडमध्ये दर्ग्याचा आधार घेत रात्र काढली आणि पहाटे पोलिसांची नजर चुकवून ज्या रस्त्यावर चेक पोस्ट नाही अशा नागझरी मार्गे जात लातूर गाठले.

शहागडमध्ये ज्यांच्यासोबत या आठ जणांनी जेवण घेतले, त्या 26 जणांना जालना येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते. आता बीडच्या चेक पोस्ट वर दहा पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे या पोलिसांची आता बीडमध्ये तातडीने तपासणी केली जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages