🌾 पुण्यात सोमवारी मार्केटयार्ड बाजारात ४१६ गाड्यांमधून १५ हजार १६५ क्विंटल कांदा-बटाटा व फळांची मुबलक प्रमाणावर आवक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 6, 2020

🌾 पुण्यात सोमवारी मार्केटयार्ड बाजारात ४१६ गाड्यांमधून १५ हजार १६५ क्विंटल कांदा-बटाटा व फळांची मुबलक प्रमाणावर आवक..


🌾 पुण्यात सोमवारी मार्केटयार्ड बाजारात ४१६ गाड्यांमधून १५ हजार १६५ क्विंटल कांदा-बटाटा व फळांची मुबलक प्रमाणावर आवक..
पुणे मार्केटयार्डातील मुख्य बाजारात भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाट्याची आवक मुबलक प्रमाणावर होत आहे. "कोरोना"मुळे बाजार समितीकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गुलटेकडी येथील श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कामकाज दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे. भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागातील आवक दिवसाआड होत असल्यामुळे बाजार आवारात होणारी गर्दी कमी होत आहे.

पुणे मार्केटयार्डातील मुख्य खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजार घटकांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे. बाजारआवारात प्रवेशद्वातून शेतकरी,आडते, हमाल, कामगार व व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या ओळखपत्र आयकार्ड व वाहनांना देण्यात आलेल्या परवानाची तपासणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.बाळासाहेब देशमुख यांच्या सचुनेनुसार सहाय्यक सचिव श्री.राम घाडगे, सहाय्यक सचिव श्री.दिपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा-बटाटा विभाग प्रमूख श्री.बाबासाहेब बीबवे, सुरक्षा अधिकारी श्री.सोमनाथ बोरकर व 40 स्टाफ आणि पोलिसांच्या मदतीने तपासणी करूनच बाजाराच्या आवारात प्रवेश देण्यात येत होता जेणेकरून बाजाराच्या आवारात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होऊन गर्दीचे प्रमाण कमी होईल तसेच बाजार आवारात प्रवेशद्वारात निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. सोमवार दि.०६ रोजी मार्केटयार्डात फळे व कांदा-बटाटा विभागाचे काम सुरू करण्यात आले होते. मार्केटयार्डातील मुख्य बाजारात कांदा-बटाट्याच्या १६६ गाड्यांमधून ७ हजार ७५१ क्विंटल कांदा-बटाटा, आले, लसूण यांची आवक झाली तर २५० गाड्यांमधून ७ हजार ४१४.६९ क्विंटल फळांची आवक झाली आहे, असे एकूण ४१६ गाड्यांमधून १५ हजार १६५ क्विंटल कांदा-बटाटा व फळांची आवक झाली आहे तसेच मोशी येथील बाजारात १४१ गाड्यामधून ३ हजार ५०० क्विंटल मालाची आवक झाली.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खडकी आणि मांजरी येथील उपबाजारात खरेदीसाठी होणारी गर्दीमुळे बाजार समितीच्या प्रशासनाकडून या दोन्ही उपबाजारांचे कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. "कोरोना"मुळे खरेदी-विक्री व्यवहारात ठराविक अंतर राखण्यासाठी तूर्तास दोन्ही बाजारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर या बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages