🚨मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ४ पोलीस ठाणे हद्दीतअर्गत संचारास मनाईचे आदेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 8, 2020

🚨मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ४ पोलीस ठाणे हद्दीतअर्गत संचारास मनाईचे आदेश..


🚨 मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ४ पोलीस ठाणे हद्दीतअर्गत संचारास मनाईचे आदेश..

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसुन येत आहे. तसेच राज्यशासनाने कोरोना विषाणु (कोबिड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३/०३/२०२० पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांच्याकडील जा.क्र. १९९६/कोरोना/मनाई/आदेश/२०२०, दि.२२/०३/२०२० अन्वये संचारास मनाई आदेश तसेच जा.क्र.२२५०/ कोरोना/मनाई/आदेश/२०२०, दि.३१/०३/२०२० अन्वये जमावबंदीचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू करण्यात आलेले आहेत. परंतु पुणे शहरातील काही भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षितेतला संकट उत्पन्न होऊ शकत असल्याने पुणे शहरातील पोलीस ठाणे भागात आदेशात अंशतः बदल करून दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी अधिक गांभीर्याने व कड़क स्वरूपात करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सारासार विचार करून तातडीची प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी फोजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ मधील तरतुदींच्या अनुषंगाने स्थानिक निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त पुणे पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणार्या नागरिकांन बाबत आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग-१ मध्य उप-विभाग यांचे कडील अधिसुचना क्रमांक ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चा क्र.एमएससी-१२७४/ व्ही-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (11-1974) चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करुन कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केल्यानुसार मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी शासनाच्या दि.०१/०४/१९७४ चे अधिसुचनेव्दारे प्राधिकृत अधिकारी म्हणुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (३) अन्वये कोणत्याही व्यक्तीला पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्राच्या पोलीस ठाणे हद्दीतील भागात कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कत्यास परिच्छेद ०६, ०७ व ०८ मधील तरतुदींच्या अधीन राहून मनाई करणारा आदेश मंगळवार दि.०७/०४/२०२० रोजी सांयकाळी ०७.०० ते मंगळवार दि.१४/०४/२०२० रोजी रात्री १२.०० वा. दरम्यान लागू करण्यात आले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीतअर्गत मनाईचे आदेश लागू..

खडक पोलीस स्टेशन..
मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक - मोहसिन जनरल स्टोअर्स - शमा फॅब्रीकेशन - शहीद भगतसिंग चोक - उल्हास मित्रमंडळ - राजा टॉवर - इम्युनल चर्चची मागील बाजू - हाजी इसाक शेख उदोन पथ - पुष्मम ज्वेलर्स मंगल क्लब जवळ महाराणा प्रताप रोड - मिठगंज पोलीस चौकी - रॉयल केटरर्स समोरील बोळ - जाहीद लेडीज टेलर्स - चाँदतारा चोक - मदिना केटरर्स - घोरपडे पेठ पोलीस चोकी - इकबाल स्क्रेप सेंटर या ठिकाणांचे आतील परिसर.

फरासखाना पोलीस स्टेशन..
१) मंगळवार पेठ - कागदीपूरा - ३३०, मंगळवार पेठ - १५७, मंगळवार पेठ - गाडीतळ चौक - कामगार पुतळा रोड - २२०, मंगळवार पेठ - २२४, मंगळवार पेठ - २२६, मंगळवार पेठ.
२) रविवार पेठ - गोविंद हलवाई चोक - हमजेखान चौक - गुरुब्दारा रोड - देवजीबाबा चोक.

स्वारगेट पोलीस स्टेशन..
१) मीनाताई ठाकरे वसाहत कमान - महानगरपासून ते गिरीधर भवन चौकापर्यंतच्या रस्त्याचा डावीकडील भाग.
२) महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग व्यासकडे जाणा-या रस्त्याचे डाव्या बाजूस असलेले सुर्यमूखी गणेश मंदिर पासून पुढे राधास्वामी सत्संग व्यासपर्यंतची डावीकडील बाजू.
३) राधास्वामी सत्संग व्यासपासून डायस प्लॉट चोकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लोट चोका पर्यंतचा डाव्या बाजूचा खिलारे वस्ती व पी अॅण्ड टी कॉलनी यांचे सीमा भितीपर्यंतचा भाग व राधास्वामी सत्संग व्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लॉट चोकापर्यंतचा उजव्या बाजूचा भाग.
४) डायस प्लॉट चोक ते सेवन लकज चोकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लोटपर्यंतचा रस्त्याचा उजवीकडील भाग.
५) डायस प्लॉट चोकाकडून लक्ष्मी नारायण चोकाकडे (सातारा रोड) जाणान्या रस्त्याचा डायस प्लॉट चौकापासून मीनाताई ठाकरे वसाहत कमानपर्यंतचा डावीकडील भाग.
६) गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चोक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग.
७) डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग व्यास दरम्यानचा रस्ता.

कोंढवा पोलीस स्टेशन..
अशोका म्युज सोसायटी - आशीर्वाद चौक, मिठानगर - सत्यानंद हॉस्पिटल गल्ली - भैरोबा मंदीर पी.एम.टी. बस स्थानक - संत गाडगे महाराज शाळा - साई मंदीर ब्रम्हा अॅव्हेन्यू सोसायटी - शालीमार सोसायटी - कुमार पृथ्वी गंगाधाम रोड - मलीक नगर.

मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या मनाईच्या आदेशा प्रमाणे सवलतीचे निकष..
अ) पोलीस, संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालय, अत्यवस्थ रुग्णाची वाहतुक, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संबंधित पुणे महानगरपालिका व शासकीय सेवा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच (कफ्र्यु पाससह) परवानगी दिलेल्या व्यक्तीनां लागू नसतील. मात्र त्यासाठी त्यांनी त्यांचे अधिकृत ओळखपत्र, आवश्यक कागदपत्रे व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.
ब) प्रतिबंधित भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांच्या
हालाचालीवर निर्बंध आणणे आवश्यक असल्याने प्रतिबंधित भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी विविध शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतूकीची सवलत रद्द करण्यात येत आहे.
क) व्यक्ती व सेवा वगळता इतरत्र कर्तव्यास असलेल्या व्यक्तीना प्रतिबंधित क्षेत्रातून शहराच्या अन्य भागात प्रवास करणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधित आस्थापनांनी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे शक्य होईल.

पुणे शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवासाठी उपलब्ध..
अ) प्रतिबंधित भागातील जीवनावश्यक वस्तू व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किरणामाल, फळे व भाजीपाला इ.) पुरविणारी केंद्रे दिवसभरात केवळ दोन तास (सकाळी १०.०० ते १२.०० वा. पर्यंत) ग्राहकांना विक्रीसाठी सुरू ठेवण्यास प्रशासनांकडून परवानगी देण्यात येईल. तशी त्याबाबत सविस्तर उद्घोषणा करण्यात येईल.
ब) जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरविणार्या केंद्रांच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्याकरीता जाणीवपूर्वक गर्दी टाळावी व त्यासाठी आवश्यक सामाजिक अंतराचे भान ठेवावे. अन्यथा पोलीसांकडून सदर दुकाने बंद करण्यास भाग पाडले जाईल व नागरिकांना घरी परत जाण्याचे निर्देश दिले जातील. ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध न झालेल्या कालावधीची भरपाई देण्याची तजवीज आवश्यकतेनुसार ठेवली जाईल.
क) प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी आपली केवळ ए.टी.एम. केंद्रे कार्यान्वित ठेवावीत.

नागरिकांना सवलतींच्या निकषांची पुर्तता करतेवेळी सर्व संबंधितांनी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळणेकरीता आरोग्य विभागाकडून सुचित केलेल्या खबरदारीच्या उपायांचे (उदा. मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर यांचा वापर तसेच सामाजिक अंतर ठेवणे ) काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील.

मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यान्वये उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त ठिकाणी सर्व संबंधितांना आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फोजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Post Bottom Ad

#

Pages