😱 पुण्यात सहकारी व खासगी दूध संघांना दूध विक्रीसाठी दिलेल्या वेळेमुळे दूध वितरणावर परिणामी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 23, 2020

😱 पुण्यात सहकारी व खासगी दूध संघांना दूध विक्रीसाठी दिलेल्या वेळेमुळे दूध वितरणावर परिणामी..


😱 पुण्यात सहकारी व खासगी दूध संघांना दूध विक्रीसाठी दिलेल्या वेळेमुळे दूध वितरणावर परिणामी..

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहकारी आणि खासगी दूध संघांना दूध विक्रीसाठी दिलेली वेळ खुपचं गैरसोयीची झाले आहे. याचा थेट परिणाम आज दुसऱ्या दिवशीही दूध वितरणावर झाला. परिणामी आज दूध संघांचे दूध शिल्लक राहिले.

यानुसार, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) विक्रीत नेहमीच्या तुलनेत आज दहा टक्क्यांनी घट झाल्याचे कात्रज डेअरीतून सांगण्यात आले.

सध्या शहरात दूध विक्रीसाठी सकाळी ते बारा अशी दोन तासांची वेळ देण्यात आलेली आहे. कित्रज डेअरीसाठी हीच वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे. दूध विक्रीसाठी या वेळा खूपच गैरसोयीच्या ठरू लागल्या आहेत. त्यामुळे या वेळा बदलाव्यात आणि त्या सकाळ, संध्याकाळी कराव्यात. सकाळी सांगते दहा आणि सायंकाळी आठ ते दहा वेळ देण्यात यावी, अशी मागणी राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के,  खजिनदार आणि कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages