🚨 मशिदीच्या मौलानाविरूद्ध नमाज पठणासाठी जमाव जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

🚨 मशिदीच्या मौलानाविरूद्ध नमाज पठणासाठी जमाव जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल..


🚨 मशिदीच्या मौलानाविरूद्ध नमाज पठणासाठी जमाव जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असतानाही या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. रमजान उपवासासाठी एकत्रित न येता घरातच नमाज पठण करावे, अशा सुचना वेळोवेळी देऊनही काही जणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कासारवाडी येथील एका मशिदीच्या मौलानाविरूद्ध जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे.

युसूफ जब्बार शेख (वय 36, रा. रेल्वे गेटखाली, कासारवाडी) असे अटक केलेल्या मौलानाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,
युसूफ शेख हे कासारवाडी येथील बिलाल मशिदीचे मौलाना आहेत. भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप जोशी यांनी फिर्याद दिली आहे. सध्या कोरोना अर्थात कोविड 19 या विषाणूने जगासह संपूर्ण देशभरात विळखा घातला आहे. पिंपरी – चिंचवड शहरही याला अपवाद नाही. शहरात तब्बल ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीसांनी वेळोवेळी घरात राहण्याचे आदेश दिले असतानाही नागरिक कोणत्या ना कारणाने विनाकारण रस्त्यावर एकत्रित येतात. मुस्लीम धर्मियांचे रमजाननिमित्त सध्या उपवास सुरू झाले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही मुस्लीम धर्मियांना घरात राहूनच नमाज पठण करावे, असे आवाहन केले आहे. यासंदर्भात पोलीसांनी शहरातील मशिदींच्या मौलानांना नोटीसही बजावली आहे. मात्र, या नोटीशीचा भंग करून कासारवाडी येथील बिलाल मशिदीचे मौलाना युसूफ शेख यांनी नमाज पठणासाठी जमाव एकत्रित आणला. त्यांच्या या कृतीमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेख यांच्यावर महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम आणि साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस हवालदार डबीर तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages