🚨सोशल पोलीसींग सेल व पुणे शहर पोलीसांची ५ लाख ५० हजार गरजवंतांना अन्न पाकीटे व धान्यवाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 19, 2020

🚨सोशल पोलीसींग सेल व पुणे शहर पोलीसांची ५ लाख ५० हजार गरजवंतांना अन्न पाकीटे व धान्यवाटप..


🚨 सोशल पोलीसींग सेल व पुणे शहर पोलीसांची ५ लाख ५० हजार गरजवंतांना अन्न पाकीटे व धान्यवाटप..

कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशात व राज्यात
लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर, पुणे शहरातील बेघर, परप्रातीय कामगार, ईशान्य भारत तसेच परराज्यातील गरजु विद्यार्थी, तृतीय पंथी, सेक्स वर्कर, झोपडपट्टीतील रहीवासी, मजुर वर्ग इत्यादीचे जेवणाचा व अन्न धान्याचे समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी, मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.डॉ.के.व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतुन तसेच मा.अप्पर पोलीस आयुक्त,पश्चिम विभाग पुणे शहर श्री.डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल पोलीसीग सेलची निर्मीती करण्यात आली आहे.

दिनाक २५ मार्च २०२० पासुन संपुर्ण देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर, सोशल पोलीसींग सेल मार्फत, विविध सेवाभावी तसेच सामाजिक संस्थाचे मदतीने आतापर्यंत, पुणे शहरातील बेघर, परप्रातीय कामगार, ईशान्य भारत तसेच परराज्यातील गरजु विद्यार्थी,तृतीय पंथी, सेक्स वर्कर, झोपडपट्टीतील रहीवासी, मजुर वर्ग इत्यादीना सुमारे ५ लाख ५० हजार अन्न पाकीटे व धान्यवाटप करण्यात आले आहे.

लॉक डाउन कालावधीत गरजुंना पुणे सोशल पोलीसींग सेल मार्फत मदत पुढे चालू राहणार आहे. त्यासाठी गरजु व्यक्तींनी तसेच ज्या समाजिक संस्थाना गरजूंना मदत करावयाची आहे त्यांनी, मो.न.८८०६८०६३०८, ८४११८००१००, ८३२९३८९१५२ या पैकी कोणत्याही एका नंबर वर संपर्क साधावा. कोणत्याही सामाजिक संस्थानी परस्पर अन्न पाकिटे, मास्क, सॅनिटाझर, साबन,तेल व धान्य वाटप करू नये. सामाजिक संस्थांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क केल्यास त्यांना सर्व प्रकारची मदत केली
जाईल.

Post Bottom Ad

#

Pages