😷 पुण्यात महापालिकेने कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे याची माहिती केली जारी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 12, 2020

😷 पुण्यात महापालिकेने कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे याची माहिती केली जारी..


😷 पुण्यात महापालिकेने कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे याची माहिती केली जारी..

राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात आज दि.12 एप्रिल रोजी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक 11 एप्रिलपर्यंत झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे 56 रुग्ण सापडले आहेत.

पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते.

दरम्यान, भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने इथे 56 रुग्णसंख्या झाली आहे. कसबा-विश्रामबाग वाडा भागात 29, तर धनकवडी-सहकारनगरमध्ये 14 रुग्ण आहेत.

वॉर्ड मध्ये असलेली रुग्ण संख्या..
औंधबाणेर – 3
कोथरूडबावधन – 1
सिंहगड रोड – 5
वारजेकर्वेनगर – 1
धनकवडीसहकारनगर – 14
कोंढवायेवलेवाडी – 8
बिबवेवाडी – 8
हडपसरमुंढवा – 21
वानवडीरामटेकडी – 8
ढोले पाटील रोड – 28
भवानी पेठ – 56
कसबाविश्रामबाग वाडा – 29
शिवाजीनगरघोले रोड – 7
नगररोडवडगावशेरी – 3
येरवडाधनोरी – 9
पुण्याबाहेरील रुग्ण – 10

पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 134 नवे रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक म्हणजे 113 मुंबईत आढळले आहेत. तर मीरा-भाइंदरमध्ये 7, पुण्यात 4; नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. 14 एप्रिल नाही, तर किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages