👌पुण्यात पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे व ग्रामस्थांचा "एक हात माणुसकीचा"; गरजवंतांना पोटभर जेवण देत अन्नधान्याची केली मदत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 3, 2020

👌पुण्यात पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे व ग्रामस्थांचा "एक हात माणुसकीचा"; गरजवंतांना पोटभर जेवण देत अन्नधान्याची केली मदत..


👌 पुण्यात पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे व ग्रामस्थांचा "एक हात माणुसकीचा"; गरजवंतांना पोटभर जेवण देत अन्नधान्याची केली मदत..
आजच्या घडीला कोरोना विषाणू संसर्गमुळे देशभरात लाँकडाउन आहे म्हणून असा एक वर्ग आहे की, एकवेळचं त्यांना अन्न सुद्धा भेटत नाही. यासाठी आपला एक हात मदतीचा‘भुकेल्यांच्या पोटात अन्न जावे, यासाठी उंड्री-पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांनी वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत उंड्री-पिसोळी येथील आस्थापनांमध्ये रोजंदारीचे काम करणाऱ्या १५० मजुरांना व उंड्री-पिसोळीच्या गरजवंत नागरिकांना पोटभर जेवण देत अन्न-धान्याचे (५ किलो उच्च प्रतीचा तांदूळ, ३ किलो मसूर डाळ, ५ किलो गव्हाचे पीठ व १ लिटर खाद्य तेल) वाटप करण्यात आले आहे.

‘कोरोना’चा मुद्दा आता आरोग्याच्या पुढे गेला आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांच्यासाठी हा काळ मोठा कठीण आहे. भुकेनं माणसं मरतील की काय, असं भय निर्माण झालं आहे. घरात बसण्याचा काळ आणखी अठरा- वीस दिवस आहे. तो वाढूही शकतो. शिवाय, घराबाहेर पडल्यानंतरही लगेच परिस्थिती सुधारणार नाही. सरकार त्यासाठी काम करते आहे. पण, ते पुरेसे नाही. "एक समाजाचे देणं" या नात्याने उंड्री-पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांनी जबाबदारीचे गांभीर्य लक्षात घेत पिसोळी मधील दगडे वस्ती व हनुमान नगर येथील आस्थापनांमध्ये रोजंदारीचे काम करणाऱ्या १५० मजुरांना व पिसोळी गावच्या गरजवंत नागरिकांना पोटभर जेवण देत कोरोना संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक ( Social Distance) अंतर दुर ठेवून अन्न- धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी, पिसोळी ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रज्ञा दगडे , समाजसेवक श्री. सोमनाथ ( आबा ) दगडे , समाजसेविका आदर्श माता गौरवित श्रीमती. शांताबाई दगडे , श्रीमती. वैशाली दगडे , माजी उपसरपंच श्री. गणपत दगडे , माजी उपसरपंच श्री. दीपक धावडे , माजी सरपंच श्री. किरण एप्रे , श्री. मिलींद मासाळ , श्रीमती. स्नेहल दगडे , श्रीमती. दिक्षा निंबाळकर , श्री. राजेंद्र धावडे , श्री. नवनाथ धावडे व समस्त दगडे परिवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार्याची भावना ठेऊन उपाशीपोटी कोणी झोपणार नाही, यासाठी आपापल्यापरीने, आपापल्या पद्धतीने, काम करत गरजवंत नागरिकांना पोटभर जेवण व अन्नधान्याची वाटप करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages