🚨 कोरोना संक्रमणशील क्षेत्रात अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची निर्धारित वेळ १०.०० - १२.००.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 24, 2020

🚨 कोरोना संक्रमणशील क्षेत्रात अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची निर्धारित वेळ १०.०० - १२.००..


🚨 कोरोना संक्रमणशील क्षेत्रात अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची निर्धारित वेळ १०.०० - १२.००..

पुणे शहरातील कोरोना अति संक्रमणशील क्षेत्रात २२ व २३ एप्रिल रोजी लागू केलेले अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत शिथिल करणेत आले असून तेथे पूर्वीप्रमाणे मनाई आदेश दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्धारित वेळेच्या बंधनांसह अंमलात राहतील, असे मा.पोलीस सहआयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी नवीन काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात २२ व २३ एप्रिल रोजी पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत फक्त दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. या आदेशाचे मुदत आज मध्यरात्री १२ वाजता संपत आहे.

या क्षेत्रातील अतिरिक्त निर्बंध शिथिल.. 
परिमंडळ एक समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.

परिमंडळ दोन  स्वारगेट  पोलीस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट, बंडगार्डन पोलीस ठाणे- ताडीवाला रस्ता

परिमंडळ तीन दत्तवाडी पोलीस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन

परिमंडळ चार – येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, खडकी पोलीस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी

परिमंडळ पाच – कोंढवा पोलीस ठाण्याचा संपूर्ण भाग, वानवडी पोलीस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८.

पोलिसांनी ७ व १४ एप्रिलला जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवता येणार असून २० एप्रिलला जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवता येणार आहेत, असे आदेशामध्ये म्हटले आहे.

Post Bottom Ad

#

Pages