🛐 रमजानचा नमाज अदा करणाऱ्या पोलीसाचा फोटो व्हायरल; धार्मिक सद्भावना दाखवणारा फोटो.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 28, 2020

🛐 रमजानचा नमाज अदा करणाऱ्या पोलीसाचा फोटो व्हायरल; धार्मिक सद्भावना दाखवणारा फोटो..


🛐 रमजानचा नमाज अदा करणाऱ्या पोलीसाचा फोटो व्हायरल; धार्मिक सद्भावना दाखवणारा फोटो..

आंध्र प्रदेशमधील गुंटूर शहरातील एक फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो गुंटूर शहरामध्ये व्हायरल झाला आहे. करोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान नाकाबंदी असणाऱ्या ठिकाणी एक मुस्लीम पोलीस कर्मचारी रमजानचा नमाज अदा करताना या फोटोत दिसत आहे. त्याचवेळी त्याचा सहकारी बाजूला उभा राहून त्याच्या नमाज पठणादरम्यान अडथळा येणार नाही याची काळजी घेत आहे.

आंध्र प्रदेशमधील गुंटूर शहरामध्ये ऑन ड्युटी असणाऱ्या एका पोलीस निरिक्षकाने रस्त्यावरच नमाज अदा केला. रिकामा रस्त्यांवरच एका बाजूला नमाज अदा करणाऱ्या या पोलीसाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी या पोलिसाचे कौतुक केलं. लालपेठ पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या कारीमुल्ला येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाची नियुक्ती गुंटूर शहरातील नाकाबंदीवर कर्ण्यात आली होती. त्यावेळी हा त्यांनी हा नमाज अदा केल्याचे सांगितले जात आहे.

ऑन ड्युटी असल्याने रस्त्यावरच नमाज अदा करत असणारा हा पोलीस कर्मचारी गुडघ्यावर बसून नमाज पठण करत असताना त्याचा सहकारी त्याच्या नमाज पठणात अडथळा येणार नाही याची काळजी घेत होता. अनेकांनी या फोटोवर सकारात्मक प्रतिक्रिया देत हा खरा भारत आहे, संकट प्रसंगी आपण अशाप्रकारची एकता दाखवायचा हवी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

गुंटूर शहरामध्ये कोरनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने त्याला रेड झोन घोषित करण्यात आलं आङे. असं असतानाच दुसरीकडे धार्मिक सद्भावना दाखवणारा हा फोटो शहरामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केलं असलं तरी काही जणांनी ड्युटीवर असताना धार्मिक कामासाठी वेळ दिल्याबद्दल या कर्मचाऱ्यावर टिका केली आहे

Post Bottom Ad

#

Pages