😱 पुण्यातील कोरोनाबळींची संख्या 100 वर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 2, 2020

😱 पुण्यातील कोरोनाबळींची संख्या 100 वर..


😱 पुण्यातील कोरोनाबळींची संख्या 100 वर..

देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता पुण्यातील कोरोनाबळींची संख्या वाढली आहे.

पुण्यातील घोरपडी परिसरात एका 68 वर्षीय संशयित रुग्णाला 21 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट 24 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाचा 2 मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे.

यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 100 वर पोहोचला आहे. तसेच काल पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 815 वर पोहोचला आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Post Bottom Ad

#

Pages