😱धक्कादायक..प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दाव्याने कोरोनामुक्त रुग्णांचे रक्त विकले जाते प्रतिलिटर 10 लाख रुपयांना.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 2, 2020

😱धक्कादायक..प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दाव्याने कोरोनामुक्त रुग्णांचे रक्त विकले जाते प्रतिलिटर 10 लाख रुपयांना..


😱 धक्कादायक..प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दाव्याने कोरोनामुक्त रुग्णांचे रक्त विकले जाते प्रतिलिटर 10 लाख रुपयांना..

कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांचे रक्त इंटरनेटवर बेकायदेशीररित्या विकले जात आहे. कोरोना आणि लसीच्या उपचारांच्या नावाखाली रुग्णांचे रक्त डार्कनेटवर विकले जात आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया (एएनयू) च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार,
कोरोना पासून बचाव तसेच रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दाव्याने कोरोना रुग्णांचे रक्त लाखो रुपयांना विकले जात आहे. एक लिटर पत्ता तरी किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, रक्तासह पीपीई, मास्क, टेस्ट किट आणि इतर वस्तू देखील बेकायदेशीरपणे विकल्या जात आहेत. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार, या वस्तू किमान 12 वेगवेगळ्या डार्कनेट मार्केटवर विकल्या जात आहेत.

डार्कनेटवर असा दावा केला जात आहे की, पीपीई आणि इतर वस्तू जगभरात कोरोनावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. विक्रेते देखील या वस्तू वेगवेगळ्या देशांमध्ये पोचविण्यासाठी तयार आहेत. अशी बहुतेक उत्पादनं अमेरिका तर काही युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधून शिपिंगसाठी उपलब्ध होती.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्माद्वारे इतर रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचाराशी संबंधित काही अहवाल समोर आले आहेत. परंतु प्लाझ्मा थेरपीचेही धोके आहेत आणि यामुळे लोकांचा बळी जाऊ शकतो. सध्या काही विशिष्ट परिस्थितींमध्येही डॉक्टर या थेरपीचा वापर करुन पाहत आहेत. प्रख्यात संशोधक रोड ब्रॉडहर्स्ट यांनी सांगितले की, काही लोक या महामारीच्या काळात सर्व देशभर गैर मार्गाने देखील पैसे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी काळात असे प्रकार वाढू देखील शकतात. म्हणून काटेकोरपणे देखरेख करणे आवश्यक आहे जेणेकरून हे गैर प्रकार बंद केले जाऊ शकते.

Post Bottom Ad

#

Pages