😱 धक्कादायक घटना..पुण्यात कोरोना झाल्याच्या भितीने एका तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 15, 2020

😱 धक्कादायक घटना..पुण्यात कोरोना झाल्याच्या भितीने एका तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..पुणे शहरातील बोपोडी भागात कोरोना झाल्याच्या भीतीने एका तरुणाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वीरेंद्र चंद्रकांत जक्कल ( वय २४, रा.खडकी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरातील खडकी भागात राहणारे वीरेंद्र जक्कल काही दिवसांपासून ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे वीरेंद्रला गुरुवारी उपचारासाठी बोपोडीतील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी वीरेंद्रची कोरोना चाचणीसाठी घशातील द्रवाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तत्पूर्वी त्याला कोरोना झाल्याच्या भितीमधून त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खडकी पोलिस दाखल होत पुढील तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages