💊 पुण्यात भारतीय जैन संघटनेने महापालिकेच्या सहकार्यातून 3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य तपासले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 16, 2020

💊 पुण्यात भारतीय जैन संघटनेने महापालिकेच्या सहकार्यातून 3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य तपासले..

भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांनी पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुणे शहरातील 3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना बाबत आरोग्य तपासणी केली आहे.
पुणे शहरातील विविध भागांत मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन, वैद्यकीय पथकासह जाऊन रुग्णांची तपासणी करीत आहेत. दि. 1 एप्रिल ते 12 मे 2020 या कालावधीत शहराच्या विविध भागांत सुमारे 73 मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन आणि वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने 3 लाख 2 हजार 418 रुग्णांची आरोग्य तपासणी केली.

त्यापैकी 5 हजार 124 संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. नागरिकांना संघटनेतर्फे आरोग्य तपासणी करण्यासाठी आवाहन करण्यात येते. या मोबाईल व्हॅनमध्ये डॉकटर, नर्सेस, कार्यकर्ते, ड्रायव्हर, कार्यरत आहेत.
पुणे शहराच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याशी संपर्क करून ताप, सर्दी, खोकला, अशाप्रकारचे आजार असणाऱ्या रुग्णांना आरोग्य तपासणी करण्यासाठी आवाहन केले जाते. त्यानंतर रुग्णांना औषधेही दिली जातात.

पुणे शहरातील बिबवेवाडी, कोंढवा, येरवडा, भवानी पेठ, हडपसर, ताडीवाला रोड, कोथरूड, कात्रज, सिंहगड रस्ता, मंगळवार पेठ, पर्वती, पाटील इस्टेट, वडगावशेरी, वडगाव बुद्रुक, वारजे – माळवाडी, कसबा पेठ, घोरपडी, गुलटेकडी, विमाननगर, आंबेगाव, मीनाताई ठाकरे वसाहत, घोरपडे पेठ, शिवजीनगर, पौड रस्ता, तळजाई, सनसिटी, बालाजीनगर, नानापेठ, मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, राजीव गांधी नगर, शांतीनगर, दत्तवाडी, बावधन, बाणेर, विश्रांतवाडी, सुस, लक्ष्मीनगर, हिंगणे, काळेपडळ, टिंगरेनगर, गंजपेठ, खडकवासला अशा 200 ठिकाणी ही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages