🕯️करोनामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 16, 2020

🕯️करोनामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा मृत्यू..

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फ्रंट लाईनवर लढणाऱ्या पोलिसांनाही आता या कोरोनाचा विळखा घातला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात शनिवारी आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,
शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी हे ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात करोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित  केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार,
राज्यभरात आत्तापर्यंत १,१४० पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यांमध्ये १२० अधिकारी आणि १०२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी ८६२ पोलिसांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, तर २६८ जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात एकूण १० पोलिसांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. यांमध्ये मुंबई पोलीस दलातील ८ पोलिसांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

#

Pages