🕉️ साप्ताहिक राशिभविष्य : 17 मे 2020 ते 23 मे 2020.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

🕉️ साप्ताहिक राशिभविष्य : 17 मे 2020 ते 23 मे 2020..

🕉️ साप्ताहिक राशिभविष्य : 17 मे 2020 ते 23 मे 2020..
मेष व्यवसायात सुधारणा होईल
रवी, शनी त्रिकोणयोग, बुध शुक्र युती होत आहे. व्यवसायात सुधारणा होण्याची आशा वाढेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. कठीण प्रश्न मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्तम योजना बनवाल. गतिमान कार्य होईल. नवीन विषयात रस येईल. लोकप्रियता वाढेल. शुभ दिनांक : 20, 21
वृषभ शेअर्समध्ये गुंतवणूक कराल
रवी, गुरु त्रिकोणयोग, बुध शुक्र युती होत आहे. ठरवलेल्या कामात यश मिळेल. खरेदी-विक्रीत यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. मानसन्मानात भर पडेल. कठीण काम मार्गी लावाल. शुभ दिनांक : 17, 18
मिथुन मनोबल राखा
चंद्र मंगल लाभ योग, चंद्र हर्षल युती होत आहे. आठवडय़ाच्या शेवटी कामात तणाव, समस्या येतील. कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाबद्दल संशय निर्माण होईल. कोणतंही वक्तव्य करताना सांभाळा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : 17, 18
कर्क महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल
सूर्य-गुरू त्रिकोणयोग, बुध-शुक्र युती तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. व्यवसायात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोन बाळगा. नोकरीत महत्त्व वाढेल. प्रवासात धोका पत्करू नका. सुखद समाचार मिळेल. शुभ दिनांक : 18, 19
सिंह रागावर ताबा ठेवा
सूर्य,चंद्र लाभयोग, बुध शुक्र युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला दिशाभूल करणारी घटना घडेल. अपेक्षित प्रश्नांची उत्तरं मिळतील. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मदत मिळेल. कला-साहित्याला नवा विषय मिळेल. उत्साह वाढेल. शुभ दिनांक : 20, 21
कन्या विचारांना चालना मिळेल
सूर्य, गुरु त्रिकोणयोग, बुध शुक्र युती होत आहे. कुटुंबात महत्त्वाचा निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत:चे महत्त्व प्रस्थापित कराल. लोकांसाठी हिताच्या योजना आखाल. विचारांना चालना मिळेल. वैचारिक देवाणघेवाणीने उत्साह वाढेल. शुभ दिनांक : 17, 18
तूळ चौफेर सावध रहा
चंद्र मंगळ लाभयोग, चंद्र हर्षल युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो अतिरेक नको. फाजील आत्मविश्वास तापदायक ठरेल. नियमांचे पालन करा. नोकरीत हलगर्जीपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : 20, 21
वृश्चिक निर्णयाचे कौतुक होईल
सूर्य, गुरु त्रिकोणयोग, बुध शुक्र युती होत आहे. व्यवसायात महत्त्वाची बातमी मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन ओळखीचा उपयोग करून घ्या. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या निर्णयाचे कौतुक होईल. नवीन विषयाचा अभ्यास कराल. शुभ दिनांक : 17, 18
धनु कामाचा व्याप वाढेल
चंद्र गुरु लाभयोग, चंद्र हर्षल युती होत आहे. मानसिक संतुलन टिकवून ठेवा. भावनेच्या आहारी न जाता कृतिशील निर्णय घ्या. व्यवसायात समस्या येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. नवीन ओळखीवर जास्त विस्वास ठेऊ नका. प्रतिमा टिकवा. शुभ दिनांक : 17, 19
मकर प्रेरणादायी घटना घडेल
सूर्य गुरु त्रिकोणयोग बुध शुक्र युती होत आहे. व्यवसायात प्रेरणादायी घटना घडेल. परिचयातून फायदेशीर योजना राबवता येतील. नोकरीत वर्चस्व टिकवून ठेवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाकण्यात यश मिळेल. कलासाहित्यात नावीन्य दर्शवाल. शुभ दिनांक : 19, 21
कुंभ मतभेद टाळा
चंद्र हर्षल युती, बुध शुक्र युती होत आहे. तुमचा मुद्दा योग्य असला तरी मतभेद होण्याची शक्यता आहे. तेव्हा तणाव टाळत मनोधैर्य टिकवून ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचे अवलोकन करून त्यानुसार वागा. प्रसंगानुरुप स्पष्टवत्तेपणा दाखवा. शुभ दिनांक : 17, 18
मीन कामाचे नियोजन करा
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध शुक्र युती होत आहे. या आठवडयाचा प्रत्येक दिवस यश व उत्साह देणारा ठरेल. व्यवसायात वाढ होईल. नवीन सुधारणा कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रतिमा वाढेल. कामाचे योग्य नियोजन करून समस्या सोडवा. शुभ दिनांक : 17, 18

Post Bottom Ad

#

Pages