😱 कोरोना वाढत असतांना पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास संकटात आणखी भर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

😱 कोरोना वाढत असतांना पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास संकटात आणखी भर..

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरोना वाढत असतांना पावसाळ्यात साथीच्या रोगांनी डोके वर काढल्यास संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

पावसाळा सुरू झाला, की साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागतो. गेल्या वर्षी महापालिकेच्या उपनगरी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दर वर्षी पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, लेप्टो, कावीळ, अतिसार आदी साथीचे रोग पसरतात. महापालिकेच्या आरोग्य खात्यापुढे या आजारांचे मोठे आव्हान असते. साथरोग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रत्येक उपनगरी रुग्णालयात एक वॉर्ड सज्ज ठेवण्यात येतो. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला, तेव्हाही महापालिकेने रुग्णालयांत स्वतंत्र कक्ष तयार केले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रत्येक रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार कण्यात आले आहेत. अशा स्थितीत पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठी अडचणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने आताच सज्ज राहण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages