😱 पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा केला खून.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

😱 पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा केला खून..


पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

वृषाली संतोष चुरगुडे (वय 29, रा. महादेवनगर, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चुरगुडे (वय 32) याला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संतोष आणि वृषालीचे 9 वर्षांपुर्वी लग्न झाले होते. संतोष एका पावडर कोटींग कंपनीत कामाला असून पत्नी एका खासगी कंपनीत कामाला होती. लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून पती-पत्नी धायरी परिसरातील घरीच होते. त्यांना एक मुलगी आहे. काही महिन्यांपासून संतोष पत्नी वृषालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याचा राग आल्यामुळे संतोषने वृषालीवर चाकूने वार केले. त्यानंतर स्थानिक रहिवाशी आणि कुटूंबियांनी वृषालीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच वृषालीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिहंगड रोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी धाव घेतली. याप्रकरणी सिंहगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages