🕯️पुण्यात पोलीस उपनिरिक्षकपदी काम केलेले धनाजी होनमाने यांना गडचिरोलीत नक्षलवाद विरोधी मोहिमेत वीरमरण.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

🕯️पुण्यात पोलीस उपनिरिक्षकपदी काम केलेले धनाजी होनमाने यांना गडचिरोलीत नक्षलवाद विरोधी मोहिमेत वीरमरण..

गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात लढताना पंढरपूरचा सुपुत्र शहीद झाला आहे. अवघ्या 29 वर्षांचे धनाजी तानाजी होनमाने यांचा नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ते पुळूज याठिकाणचे रहिवासी होते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. अत्यंत वाईट बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच धनाजी यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या जाण्याने दोन्ही परिवारांवर शोककळा पसरली आहे. चार महिन्यांपूर्वीच ते गावी येऊन गेले होते अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली आहे. नक्षलवाद विरोधी मोहिम राबवताना त्यांना वीरमरण आले आहे.
धनाजी तानाजी होनमाने यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. 29 एप्रिल 2015 मध्ये त्यांची पुण्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 2017 मध्ये त्यांची पुण्याहून गडचिरोली याठिकाणी बदली झाली होती.

अकरावी बारावीचे शिक्षण त्यांनी पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले होते तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुणे गाठले होते. गडचिरोलीमध्ये त्यांनी अनेक धाडसी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला होता.

पोलीस महानिरिक्षकांकडून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर लवकरच लग्न देखील होणार होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी त्यांची प्रत्येक जबाबदारी पार पाडली होती. मात्र नक्षलवाद विरोधातील या लढाईत त्यांना वीरमरण आले.

Post Bottom Ad

#

Pages