😷 लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात तर चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

😷 लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात तर चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता..

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लादलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात येत आहे. त्यानंतर सलग दोन वेळा लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली आहे . लॉकडाउनचा तिसरा टप्पाही आज (१७ मे) संपत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे चौथा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसमवेत एक आढावा बैठक घेतली. बैठकीत लॉकडाऊन 4.0वर चर्चा झाली. बैठकीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 30 जिल्हा व महापालिका क्षेत्रात कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे ठरवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या आढावा बैठकीत या 30 जिल्ह्यांबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, या जिल्ह्यांमध्ये कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचा उद्रेक झालेल्या शहरात लॉकडाउन कायम ठेवून उर्वरित जिल्ह्यातील व्यवहार सुरू करण्याची मूभा या टप्प्यात दिली जाऊ शकते. सरकारने निवडलेल्या 30 नगरपालिका क्षेत्रांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दलही माहिती देण्यात आली, त्यामध्ये संक्रमित रुग्णांची संख्या, दुप्पट दर आणि कोरोना चाचणीसंदर्भातही चर्चा झाली आहे.

▪️ महाराष्ट्र : पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, सोलापूर
▪️ गुजरात : बडोदरा, अहमदाबाद आणि सूरत
▪️ मध्य प्रदेश : भोपाळ आणि इंदुर
▪️ आंध्र प्रदेश : कुरनुल
▪️ तामिलनाडू : विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, अरियालुर, ग्रेटर चेन्नई आणि तिरुवल्लूर
▪️ राजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूर
▪️ दिल्ली : जास्त करून रेड झोन भाग
▪️ ओडिशा : बरहमपूर
▪️ पश्चिम बंगाल : हावड़ा आणि कोलकाता
▪️ तेलंगणा : ग्रेटर हैदराबाद
▪️ पंजाब : अमृतसर
▪️ उत्तर प्रदेश : आग्रा आणि मेरठ

दरम्यान, काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करताना २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्याचबरोबर लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली होती.

Post Bottom Ad

#

Pages