🛅 पुणे मार्केट यार्डातील भुसार बाजार मंगळवार दि.१९ रोजी पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

🛅 पुणे मार्केट यार्डातील भुसार बाजार मंगळवार दि.१९ रोजी पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद..

पुणे गुलटेकडी मार्केट यार्डातील आठ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील व्यापारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुळ-भुसार बाजार मंगळवार दि.१९ रोजी पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तावल यांनी दिली.

भुसार बाजारात आठ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दि पूना मर्चंटस् चेंबरकडून शनिवारी पाच वाजता कार्यकारणी बैठक घेण्यात आली. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तावल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, अनिल लुंकड, राजेंद्र बाठीया, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नितीन नहार, ईश्वर नहार, रायकुमार नहार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फुलबाजार विभाग बंद आहेत. शहरात नागरिकांना अन्नधान्य आणि किराणाचा पुरवठा करणारा भुसार बाजार सुरु होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तो ही बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात अन्नधान्य आणि किराणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
  
दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तावल म्हणाले,
"गेले दोन महिने भुसार बाजार नियमित सुरु ठेवला आहे. त्यामुळे पुण्यासह शेजारच्या काही जिल्ह्यात अन्नधान्य आणि किराणाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसार बाजारातील आणखी व्यापारी आणि इतर व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. लोकांनी घाबरू नये. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून आणखी उपाययोजनाद्वारे भुसार बाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच "रविवारी बाजाराला सुट्टी आहे. सोमवारी बाजार सुरु आहे. मात्र, एकच दिवस बाजार सुरु आहे, असे समजून तेथे खरेदीसाठी गर्दी करु नये." - बी.जें.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

Post Bottom Ad

#

Pages