😱 महापालिका प्रशासनाचा बेफिकीरपणा रूग्णालयातून एका 29 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चोरीला ; वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 19, 2020

😱 महापालिका प्रशासनाचा बेफिकीरपणा रूग्णालयातून एका 29 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चोरीला ; वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

मृत्यूने माणसाची छळातून सुटका होत असते असे म्हणतात, पण या व्यक्तीला मृत्यूनंतर सुद्धा छळ सहन करावा लागला आहे, असाच प्रकार वाशीतील महापालिकेच्या रूग्णालयात रविवारी घडला. कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह रूग्णालयातून चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाशी महापालिका प्रशासनाचा बेफिकीरपणा किती आहे याची कल्पना येते.

वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एका 29 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह मिळावा, यासाठी शनिवारपासून (ता.16) रुग्णालयात खेटे घालत आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. शेवटी शवागारात अनेकवेळा शोधाशोध केल्यानंतर देखील मृतदेत न सापडल्याने अखेर हा मृतदेह चोरीला गेल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईंकांना सांगण्यात आले.

या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने वाशी पोलीस ठाण्यात मृतदेह चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गडबडीत हा मृतदेह दुसऱ्या कुणाला तरी दिला असावा, असा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणानंतर महापालिका आरोग्य विभागाचा गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीचे काम सुरु..
मृत उमर शेख याची कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने 14 मे रोजी त्याचा मृतदेह घेऊन जाण्याबाबत त्याच्या नातेवाईकांना कळविले होते. मात्र, उमरच्या नातेवाईकांना अत्यंसंस्कारासाठी पैसे जमविण्यास उशीर झाल्याने ते शनिवारी मृतदेह ताब्यात घेण्यास गेले. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिल्यानंतर आयुक्त मिसाळ यांनी याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार वाशी पोलिसांकडून रविवारी उशीरापर्यंत महापालिका रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीचे काम सुरु होते.

Post Bottom Ad

#

Pages