👌स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाचा जीव वाचवणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 19, 2020

👌स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाचा जीव वाचवणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडिओ बराच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक माकडीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी वीजेच्या तारेवर उडी घेताना दिसतेय. माकडिणीचं पिल्लू वीजेच्या तारेमध्ये अडकल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर समोरील बाजूला इमारतीवर त्या पिल्लाच्या आईसह काही माकडं बसलेत
वीजेच्या तारेमध्ये अडकलेलं पिल्लू उडी मारुन वारंवार आईकडे जाण्याचा प्रयत्न करतं. पण, अंतर जास्त असल्यामुळे त्याला उडी घेता येत नाही. घाबरलेल्या आपल्या पिल्लाची धडपड पाहून अखेर समोरच्या इमारतीवर बसलेली त्याची आई कसलाही विचार न करता त्या वीजेच्या तारेवर उडी घेते आणि पिल्लाला दुसऱ्या तारेवर येण्यास मदत करते. पण, त्यानंतरही पिल्लाला उडी घेता येत नाही हे पाहून ही आई पुन्हा एकदा तारेवर उडी घेते आणि क्षणार्धात पिल्लाला कवटाळून इमारतीवर परतते.
इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रविण कासवान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. यासोबत “एखाद्या आईने मुलाला वाचवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम अपयशी कशी ठरेल” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाचा जीव वाचवणाऱ्या या माकडिणीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Post Bottom Ad

#

Pages