🚨 राज्य पोलीस दलातील १ हजार २७३ पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 19, 2020

🚨 राज्य पोलीस दलातील १ हजार २७३ पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा..

राज्य पोलीस दलातील आणखी ५५ पोलिस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिस कर्मचा-यांचा आकडा १३३८ वर गेला आहे. आज नव्या रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकौंटवरून ही माहिती दिली आहे.

राज्य पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकार्‍यांसह १३१ अधिकारी आणि १ हजार १४२ अंमलदार अशा एकूण १ हजार २७३ पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. काल गेल्या चोव्वीस तासांत ६७ पोलिसांच्या कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात आज पुन्हा एकदा ५० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे असून आता एकून आकडा १३२८ पर्यंत पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ११ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाचा राज्यात चांगलाच संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३५ हजार ५८ जणांना कोरोना झाला आहे. तर त्यापैकी ८ हजार ४३७ जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. तर या कोरोनामुळे आता पर्यंत राज्यातील १ हजार २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन ४ ची घोषणा केली आहे. तर मुंबई – पुण्यासारख्या शहरात यासाठी काही वेगळे नियम लागू केले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages