🛃 प्रवासाची परवानगीसाठी या वेबसाईटवर ई-पाससाठी अर्ज करा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 20, 2020

🛃 प्रवासाची परवानगीसाठी या वेबसाईटवर ई-पाससाठी अर्ज करा..

देशभरात लॉकडाऊन चौथा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात सरकारने नियम शिथिल केले आहेत. सरकारने आता प्रवासाची परवानगी देण्यास पास प्रक्रियेसाठी नवीन वेबसाईट serviceonline.gov.in लाँच केली आहे. या वेबसाईटला नॅशनल इन्फर्मेंटिक्स सेंटरने तयार केले आहे. या वेबसाईटवर सध्या 17 राज्यांचे नागरिक ई-पाससाठी अर्ज करू शकतात.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास नागरिक या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. या वेबसाईटद्वारे ई-पास अर्जाचे स्टेट्स देखील तपासता येईल. विद्यार्थी, सर्व्हिस प्रोव्हाईडर, पर्यटक, भाविक, मेडिकल ट्रॅव्हल आणि लग्न अशा प्रकारातील लोक अर्ज करू शकतात. सोबतच प्रवासाच्या कारणाचे पुरावे देखील द्यावे लागणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया –
▪️ सर्वात प्रथम वेबसाईट http://serviceonline.gov.in/epass/ वर गेल्यावर ‘Select State to Apply e-Pass’ या पर्यायावर जाऊन राज्य निवडावे.
▪️ येथे तुम्हाला राज्यांद्वारे देण्यात येणारी सर्व ई-पास सेवा दिसेल. तुम्हाला ज्या सेवेसाठी अर्ज करायचा आहे, त्यावर क्लिक करावे.
▪️ यानंतर राज्याच्या ई-पास पोर्टलवर रीडायरेक्ट होईल. येथे सर्व महत्त्वाची माहिती, कागदपत्रे अपलोड करावे व अर्ज सबमिट करावा. सबमिट केल्यानंतर तुम्ही अर्जाच्या रेफ्रेंस नंबरद्वारे अर्जाचे स्टेट्स तपासू शकता.

अर्जाचे स्टेट्स तपासण्यासाठी प्रक्रिया –
▪️ http://serviceonline.gov.in/epass/ वेबसाईटवर गेल्यावर ‘Track Your Application’ वर क्लिक करा.
▪️ ड्रॉप डाऊन मेन्यूद्वारे राज्य निवडा.
▪️ येथे ‘Through Application Reference Number’ पर्याय निवडा.
▪️ यानंतर बॉक्समध्ये अर्जाचा रेफ्रेंस नंबर टाका. कॅप्चा भरून, ई-पासचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी सबमिट करा.
▪️ जर तुमच्याकडे अर्जाचा रेफ्रेंस नंबर नसल्यास, ‘Through OTP/Application Details’ या पर्यायाद्वारे देखील स्टेट्स जाणून घेऊ शकता.

Post Bottom Ad

#

Pages