🚨 खोट्या माहितीच्या व्हायरल मेसेजसाठी महाराष्ट्र पोलिसांचे भन्नाट ट्विट.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 20, 2020

🚨 खोट्या माहितीच्या व्हायरल मेसेजसाठी महाराष्ट्र पोलिसांचे भन्नाट ट्विट..

खोटी माहिती पसरवणारे मेसेज व्हायरल होण्याचं प्रमाण हल्ली प्रचंड वाढलं आहे. खोट्या माहितीवर नियंत्रण मिळवणं, हे सुद्धा पोलिसांसाठी आव्हानात्मक काम झालं आहे. विशेषतः करोनामुळे लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक बाबींबद्दल खोटी माहिती पसवण्याचे प्रकार वाढल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भात नागरिकांना सजग होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट केलं आहे.

संवादासाठी सोशल मीडियाचा वापर वाढला, त्याचबरोबर वाईट गोष्ट समोर येऊ लागली. अनेक महत्त्वाच्या माहितीसोबतच अनेक खोटी आणि चुकीची माहिती देणारे संदेशही व्हायरल होऊ लागले. अशा स्वरूपाच्या माहितीमुळे लोकांची दिशाभूल होऊ लागली. खोटी माहिती पसरवणारे मेसेज नागरिकांनी फॉरवर्ड करू नये यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. खोटी माहिती फॉरवर्ड करू नका, असं आवाहन करण्यासाठी पोलिसांनी धमाल सिनेमातील विनोदी प्रसंगाचा आधार घेतला आहे. विमान धावपट्टीवर उतरवताना घडलेल्या या प्रसंगातून महाराष्ट्र पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून येणारे मेसेज खात्री न करता फॉरवर्ड न करण्याचं आवाहनं केलं आहे.

“नियंत्रण तुमच्या हातात आहे. चुकीच्या माहितीचं विमान टेक ऑफ होण्याआधीच ते थांबवा. कुठलाही संदेश फॉरवर्ड करण्याआधी त्यातील माहितीची सत्यता पडताळून पहा,” असं पोलिसांनी ट्विट करून म्हटलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages