🚨 "वंदे मातरम" लघुपटातून कर्तव्यदक्ष पोलिसांना मानाचा मुजरा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 20, 2020

🚨 "वंदे मातरम" लघुपटातून कर्तव्यदक्ष पोलिसांना मानाचा मुजरा..

करोना विषाणूने देशात दहशत माजवली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यातच या काळात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात देशातील नागरिक जरी घरी सुरक्षित असले तरीदेखील पोलीस, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत आहेत. म्हणूनच अनेकांनी विविध माध्यमातून त्यांच्या कार्याला सलाम केलं आहे. यामध्येच आता वंदे मातरम या लघुपटातून कर्तव्यदक्ष पोलिसांना मानाचा मुजरा करण्यात आला आहे.

शैलेंद्रग निर्मित ‘वंदे मातरम’ या लघुपटाला प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं असून आर्या आंबेकर हिने या लघुपटातील ‘वंदे मातरम’ हे गीत गायलं आहे. दोन मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये कर्तव्य बजावत असतांनाचे पोलिसांचे काही मोलाचे क्षण टिपण्यात आले आहेत. या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या देशातील पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. आतापर्यंत देशातील प्रत्येक जनतेने शक्य होईल त्याप्रमाणे या योद्ध्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी गाण्याच्या माध्यमातून त्यांचे भाव व्यक्त केले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages