😱 दुकानातून मुलाचे डायपर आणण्यावरून तलाक ; पतीवर गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 21, 2020

😱 दुकानातून मुलाचे डायपर आणण्यावरून तलाक ; पतीवर गुन्हा दाखल..

दुकानातून मुलाचे डायपर आणण्यावरून झालेला वाद थेट घटस्फोटापर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा येथे घडला. मात्र, पतीने तोंडी दिलेला तलाक मान्य नसल्यामुळे पत्नीने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी पतीविरुद्ध ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१७’ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले..
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका मुस्लिम तरुणीचा विवाह २०१५ साली नागपाड्यातील बेलासिस रोड या ठिकाणी राहणाऱ्या तरुणासोबत झाला असून या दाम्पत्याला अडीच वर्षाचा मुलगा आहे. या विवाहितेच्या तक्रारीनुसार २०१८ मध्ये मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात महिन्यांनी पतीने नातेवाइकांसमोर माफी मागितली होती. त्यानंतर हे दोघे दाम्पत्य एकत्र आले आणि दोघांचा सुखीसंसार सुरू होता.

सोमवारी दुपारी पत्नीने पतीला मुलासाठी दुकानातून डायपर घेऊन येण्यास सांगितले, परंतु पतीने हे माझे काम नाही, असे सांगून डायपर आणण्यास नकार दिला, यावरून दोघात भांडण सुरु झाले. हे भांडण विकोपाला जाऊन पतीने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून तुझा माझा यापुढे संबंध तुटला, असे पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकारामुळे गोधळलेल्या पत्नीने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरुद्ध तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१७’ या नवीन कायद्याअंतर्गत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages