🕯️कोरोनामुळे पुणे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई यांचा मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 21, 2020

🕯️कोरोनामुळे पुणे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई यांचा मृत्यू..

पुणे वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई दीपक नथुराम सावंत (वय 42) यांची कोरोनामुळे प्राणजोत मावळली. कोरोनामुळे पुणे पोलिस दलातील कर्मचार्याचा दुसरा मृत्यू आहे. कोरोना हॉटस्पॉट परिसरात असलेल्या वाहतूक विभागात ते काम करत असतांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यानां भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचार दरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.

कोरोनामुळे पुणे पोलिस दलात दुसरा मृत्यू..
मागिल काही दिवसापुर्वी पुणे पोलिस दलातील एक सहाय्यक पोलिस फौजदाराचा कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला तर आज वाहतूक विभागातील पोलीस शिपाई यांचा दुसरा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आता पर्यत 22 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील अनेकांनी कोरोना वर मात केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages