😷जप्त केले मास्क व हँड सॅनिटायझर वैद्यकीय सेवा व अन्य अत्यावश्यक सेवांमध्ये वितरीत करून टाका ; उच्च न्यायालयाने.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 21, 2020

😷जप्त केले मास्क व हँड सॅनिटायझर वैद्यकीय सेवा व अन्य अत्यावश्यक सेवांमध्ये वितरीत करून टाका ; उच्च न्यायालयाने..

जप्त केले मास्क व हँड सॅनिटायझर आदि वस्तू या सक्षम प्राधिकरणांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे वैद्यकीय सेवा व अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांमध्ये वितरीत करून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

आज कोरोना विरुद्धच्या युद्धात लढत असलेल्या डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार या योद्ध्यांना अशा संरक्षण साहित्याची गरज आहे. त्यामुळे जप्त झालेल्या मास्क व हँड सॅनिटायझर या योद्ध्यांना वाटून टाका असे, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

आदेशात त्यांनी असे म्हंटले आहे की, ज्या जप्त साहित्यांविषयी सक्षम प्राधिकरणांनी अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अंतरिम आदेश काढून त्यांचे वितरण करण्यास सांगितले आहे आणि त्या अंतरिम आदेशाविरोधात संबंधितांनी कोणतेही कायदेशीर पाऊल उचलले नाही, अशा साहित्यांचे अत्यावश्यक सेवांमधील कामगार-कर्मचाऱ्यांना वितरण करण्याची कार्यवाही तत्परतेने करावी.

पोलिसांनी ठिकठिकाणी तक्रारींच्या आधारे अवैध साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेले साहित्य सरकारने लवकरात लवकर अशा गरजूंना देण्याची आवश्यकता आहे. मात्र, याविषयी तत्काळ कार्यवाहीचे कोणतेही धोरण दिसत नाही’, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका पुण्यातील माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी अॅड. विशाल कानडे व अॅड. हर्ष पार्टे यांच्यामार्फत केली होती.

Post Bottom Ad

#

Pages