☂️ पोलिसांनी "छत्री वापरा डिस्टन्स पाळा" असा संदेश देत शहरातून काढली जनजागृती रॅली.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 21, 2020

☂️ पोलिसांनी "छत्री वापरा डिस्टन्स पाळा" असा संदेश देत शहरातून काढली जनजागृती रॅली..

लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेमुळे शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. त्याचा विचार करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी सोशल डिस्टन्सींग पाळावे यासाठी पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत कऱ्हाड शहरातुन छाता रॅली काढत छत्री वापरा, डीस्टन्सींग पाळा हा संदेश देवुन जनजागृती केली.

कोरोना बाधीतांची संख्या वाढल्याने मध्यंतरी शहरासह मलकापूर व परिसरातील ११ गावात पुर्णतः १०० टक्के लॉककडाऊन जारी केले होते. त्यामुळे शहर व तालुक्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर फिरणारांना प्रारंभी काठीने प्रसाद दिला. त्यानंतर वाहनजप्त करून कारवाईही केली. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणार्‍यांना रोखले. शहरातील सर्व रस्ते बॅरिकेस्टसनी बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये घरी रहा, सुरक्षित रहा, असे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. परंतु काही लोकांच्या चुकीमुळे कराड शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. तर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तो शंभराच्या जवळपास पोचली आहे. त्याचा विचार करुन कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी व त्याला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहेत.

त्याअंतर्गतच पोलिस उपाधिक्षक गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांच्या संकल्पनेतुन आज पोलिसांनी छत्री वापरा डिस्टन्स पाळा असा संदेश देत शहरातून जनजागृती रॅली काढली. ही रॅली दत्त चौकातून मुख्य रस्त्याने बाजारपेठ मार्गाने ही चावडी चौक, कृष्णा नाका व पुन्हा शहर पोलिस ठाण्याजवळ आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

या दरम्यान पोलिसांनी हातात छत्री घेऊन नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले. या अनोख्या पद्धतीने पोलिसांनी केलेल्या जनजागृतीची शहरात चांगलीच चर्चा झाली.

Post Bottom Ad

#

Pages