👉पालखी आयोजकांनी तोडगा काढत मानाच्या सातपैकी चार पालख्या केल्या रद्द.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 22, 2020

👉पालखी आयोजकांनी तोडगा काढत मानाच्या सातपैकी चार पालख्या केल्या रद्द..

राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पालखीचे स्वरूप कसे असावे याबाबत पालखी सोहळा आयोजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता यावर पालखी आयोजकांनी तोडगा काढला असून मानाच्या सातपैकी चार पालख्या रद्द करण्यात आल्या आहेत.

एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सात मानाच्या पालख्यांपैकी पैठणची एकनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज पालखी, जळगावच्या मुक्ताईनगरची मुक्ताईनगर पालखी आणि सासवडची सोपानकाका पालखी यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आल्या आहेत. नेहमीचा पालखी सोहळा रद्द करताना परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही या पालख्यांनी सरकारला दिले आहेत. त्यापैकी सरकार जी परवानगी देईल, त्यानुसार पालखी सोहळा करण्याची तयारी असल्याचे रघुनाथ महाराज गोसावी यांनी म्हटलं आहे.

प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. म्हणजे पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल आणि दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. दशमीला तीस मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

तर दुसरीकडे आळंदी आणि देहू संस्थाननेही मोजक्याच वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला पालखी नेण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालखी प्रमुख आणि पालखीशी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती.

Post Bottom Ad

#

Pages