😱 पुलवामामध्ये सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या टीमवर हल्ला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 22, 2020

😱 पुलवामामध्ये सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या टीमवर हल्ला..

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ज्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता, त्याच पुलवामामध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका टीमवर हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या पुरवामाच्या प्रिचू या भागामध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. या चकमकीमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारे भारतीय जवानांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
जवानांच्या पथकावर अचानक काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचं एक संयुक्त नाका पथक गस्तीवर असताना हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्यामुळे जवानांना सावरायला वेळ लागला. या हल्ल्यानंतर या संपूर्ण भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. बुधवारी देखील श्रीनगरजवळ अशाच प्रकारे झालेल्या एका हल्ल्यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांकडची हत्यारं देखील लुटून नेली. आजच सकाळी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अशीच चकमक झाली होती. या हल्ल्यानंतर लोलाबच्या जंगलांमधून जवानांनी तीन दहशतवाद्यांना पकडलं आहे.

नुकताच भारतीय लष्कराच्या धडक कारवाईमध्ये हिजबुलचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा करण्यात आला होता. श्रीनगरमध्ये देखील लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केल्यानंतर आता दहशतवाद्यांनी अशा प्रकारे छुपा हल्ला करत त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages