😷 राज्यात २४ तासात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचा आकडा १७५८ वर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 24, 2020

😷 राज्यात २४ तासात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचा आकडा १७५८ वर..

नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतात. मात्र कोरोनाची लागण पोलिसांनाच मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं समोर आलं आहे. मागील २४ तासात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचा आकडा १७५८ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत १८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra: 87 police personnel of the state found COVID-19 positive in last 24 hours taking total number of affected cops to 1,758 out of which 18 have died due to the virus and 673 have recovered. pic.twitter.com/gnA4bLRgt9 — ANI (@ANI) May 24, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. पोलिसांमध्ये १७४ अधिकारी आणि १४९७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५४१ पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लॉकडाऊन कानळात पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, एका तुकडीत १०० जवानांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

#

Pages