😱 धक्कादायक घटना..वादावादी सोडवण्यासाठी गेलेल्या होमगार्डला पाच जणांच्या टोळक्याची बेदम मारहाण ; गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 24, 2020

😱 धक्कादायक घटना..वादावादी सोडवण्यासाठी गेलेल्या होमगार्डला पाच जणांच्या टोळक्याची बेदम मारहाण ; गुन्हा दाखल..

पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे एका टोळक्याची दारु आणि सिगारेट ओढून दुकानदाराशी झालेली वादावादी सोडवण्यासाठी गेलेल्या होमगार्डला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाले आहेत.

पाच जणांच्या टोळक्याच्या मारहाणीत सौरभ साळुंखे असे जखमी झालेल्या होमगार्डचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली (घरकुल) येथे पाच जणांचं एक टोळकं एका दुकानाच्या समोर सिगारेट ओढत होते. तेव्हा तेथील महिलेने इथं थांबू नका असं म्हटल्यानंतर दुकानदार आणि या तरुणांमध्ये वाद सुरु झाला. यावेळी होमगार्ड सौरभ साळुंखे तिथून जात होते. त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना हस्तक्षेप करीत विचारणा केली. तेव्हा या पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात होमगार्ड सौरभ हे जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मद्यपान केलं होतं. तेथून जाणाऱ्या लोकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रिकरण केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages