🚻 महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 24, 2020

🚻 महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

राज्यात आलेल्या कोरोना संकटामुळे ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी घरातून बाहेर पडायलाही बंदी करण्यात आली आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशातच १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच शाळा सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत.

आठवड्यातील ४८ तास शाळा..
महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्यातील ४८ तास त्या सुरू ठेवल्या जातील. मात्र शनिवार- रविवारी सुट्टी देणाऱ्या शाळांना ही मुभा देण्यात आलेली नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र शाळांचे तास कमी करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर सर्व नियम पाळणं शाळांना बंधनकारक असणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

शाळा सुरू करताना दोन पर्याय..
पर्याय पहिला - विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं.
पर्याय दुसरा - प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय आहे. या दोन्ही पर्यायाचा विचार राज्य सरकार करत आहे.

Post Bottom Ad

#

Pages