🚨 पुण्यात पैसाच्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना कोंढवा पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 24, 2020

🚨 पुण्यात पैसाच्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना कोंढवा पोलिसांनी केली अटक..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथा टप्प्यातील लॉकडावूनच्या काळात कोंढवा परिसरात पैसाच्या वादावरून झालेल्या बाचाबचीच्या रागातून सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांनी फिर्यादी तरुणावर लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून फरार झाले. याघटने प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींचा कोंढवा तपास पथकातील पोलिस शोध घेत असतांना पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी कात्रज-कोंढवा रोड, केदारेश्वरनगर पाण्याचे टाकीजवळ, पुणे याठिकाणी सापळा रचून दाखल गुन्हयातील सराईत गुन्हेगारसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

फिर्यादी रोहन प्रताप कामठे (वय २३, रा. टिळेकरनगर, कोंढवा बु. पुणे) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार मंगेश अनिल माने (वय २४, रा. सरगमचाळ, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) व त्याचे साथीदार आरोपी १) अंकीत आप्रेश भोसले (वय २०, रा. गोकूळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), २) आदित्य शांताराम तणपूरे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), ३) विधीसंघर्षीत बालक (याचे पालकांना समजपत्र देवून त्यास सोडून दिले आहे.) या आरोपींना ताब्यात घेत कोंढवा पोलीस ठाणेमध्ये गु.र.नं.६९१/२०२० भादंविक.३२६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेमके काय घडले..
बुधवार (दि.२०) रोजी संध्याकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहन प्रताप कामठे (वय २३, रा. टिळेकरनगर, कोंढवा बु. पुणे) यांचा मित्र अभिषेक जाधव याने फिर्यादीला सोसायटीचे पार्कीगमध्ये कॉल करुन बोलावुन एक जणासोबत पैसे परत देण्याचे कारणावरुन बाचाबाची झाल्याचे सांगितले तेव्हा तेथे फिर्यादी यांचा मित्र अक्षय आवारे हा आल्याने फिर्यादी व अक्षय आवारे हे तेथुन निघुन टिळेकरनगर मार्गे गोकुळनगर येथे निघाले असता सिहगड सिटी स्कुलचे शेजारी फिर्यादी व अक्षय आवारे यांना आरोपी मंगेश माने व त्याच्या तीन साथीदारांनी मोटर सायकलवर येवुन फिर्यादी यांना थांबवून आरोपी मंगेश माने याने फिर्यादी जवळ येवुन "माझे व अभिषेक जाधव याचे भांडणात का पडला तुला आता सोडत नाही" असे म्हणत आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डाव्या मांडीवर, कपाळावर व डोक्यात मारुन गंभीर जखमी केले तसेच फिर्यादी यांचा मित्र अक्षय आवारे यांला शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. याघटने प्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी त्याच्या साथीदाराविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कोंढवा पोलिसांनी आरोपींना केली अटक..
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री.महादेव कुंभार यांनी दाखल गुन्हयात तपासाकामी आदेशीत केल्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील दाखल गुन्ह्यातील हल्ले खोरांचा शोध घेत असतांना पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना आरोपीच्या ठाव ठिकाण्याबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळताच सहा.पोलिस निरीक्षक चेतन मोरे, पोलिस हवलदार संतोष नाईक, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक अमित साळुके, पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस शिपाई ज्योतीबा पवार, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कात्रज-कोंढवा रोड, केदारेश्वरनगर, पाण्याचे टाकीजवळ, पुणे याठिकाणी सापळा रचून सराईत गुन्हेगारा मंगेश अनिल माने (वय २४, रा. सरगमचाळ, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) व त्याचे साथीदार आरोपी १) अंकीत आप्रेश भोसले (वय २०, रा. गोकूळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), २) आदित्य शांताराम तणपूरे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), ३) विधीसंघर्षीत बालक (याच्या पालकांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून पालकांना समजपत्र देवून त्यास सोडून दिले आहे.) यांस ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देत गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल, दोन धारदार लोखंडी कोयते त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले.

सदरची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.सह.पोलीस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री.महादेव कुंभार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलिस हवलदार संतोष नाईक, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक अमित साळुके, पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस शिपाई ज्योतीबा पवार, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages