😱 जुना पुणे-मुंबई महामार्गावर तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात ; दोन जण जखमी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 25, 2020

😱 जुना पुणे-मुंबई महामार्गावर तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात ; दोन जण जखमी..

पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात दोघे जखमी आहेत. दरम्यान, या अपघाताचा व्हिडीओ व्हाटस्अप ग्रुपवर व्हायरल झाला असून तो पाहणाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारच्या सुमारास एक तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला. निगडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पुढे चाललेल्या एका मालवाहू तीन चाकी टेंपोला जोरात धडक दिली. त्यात बसलेली महिला आणि पुरूष दूरवर फेकले गेले आणि टेपो बीआरटीच्या रेलींगवर धडकला. कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages