😱 सावधान..पुण्यात वाइनशॉपच्या मालकालाच कोरोनाची लागण.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 25, 2020

😱 सावधान..पुण्यात वाइनशॉपच्या मालकालाच कोरोनाची लागण..

पुणे शहरातील बाणेर आणि बालेवाडी येथील परिसरात वाइनशॉपच्या मालकालाच कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कोरोना ग्रस्त वाइनशॉप मालकाची परिसरात दोन वाइनशॉप आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी कोरोनाची खबरदारी घेत दोन्ही वाइनशॉपची दुकाने सील केली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद असणारी वाइनशॉप चार मे पासून सुरू करण्यात आली. त्या दिवसापासून वाइनशॉप मालकाची दोन्ही दुकाने रोज उघडण्यात येत होती. वाइनशॉपचा मालक दोन्ही दुकानांवर सतत हजर असल्याने वाइनशॉप मालकाला करोनाची लागण झाली. हि बाब नागरिकांच्या लक्षात येताच परीसरात घबराट पसरली आहे. दुकान मालकाच्या संपर्कात आलेले कामगार व नातेवाईक यांना विलीगीकरण करत त्यांची कोरोनाची तपासण्या करण्यात आली. मात्र, त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीसुद्धा या सर्वांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी तीन जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages