🚨"पोलीस निरीक्षक दया नायक" यांच्या पथकाने माओवाद्यांच्या संपर्कात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 25, 2020

🚨"पोलीस निरीक्षक दया नायक" यांच्या पथकाने माओवाद्यांच्या संपर्कात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला केली अटक..

नेपाळ मधील माओवाद्यांच्या संपर्कात असणारा कुख्यात दरोडेखोर दलबीरसिंग रावत उर्फ पप्पू नेपाळी याला दरोड्याचा तयारीत असतांना मुंबईतील अंधेरी पश्चिम येथुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने शनिवारी केली.

अटक करण्यात आलेल्या कुख्यात दरोडेखोर दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी यांच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत राउंड जप्त केले आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
दलबीरसिंग रावत हा शनिवारी दुपारी लॉकडाऊनचा फायदा घेऊन अंधेरी पश्चिम येथील मस्तकार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. दया नायक यांनी पोलीस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दलबीरसिंग बलवंतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पू नेपाळी (३७) याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत राऊंड मिळून आले.

अटक करण्यात आलेला दरोडेखोर दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी याच्यावर मुंबई, ठाणे नवी मुंबईत दरोड्याचे ३० पेक्षा अधिक गुन्हाची नोंद आहे, २०१७ मध्ये त्याने आंध्रप्रदेश येथील विजयवाड्यात एका सोने बनवण्याच्या कारखान्यात सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १६ किलो सोन्याचे दागिने लुटल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली. दलबीरसिंग उर्फ पप्पू नेपाळी हा नेपाळ मधील माओवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages