🚨 पोलिसांच्या मृत्यू झाल्यावर 50 लाख रूपये देण्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या आरोग्यावर किंवा कोरोनाची चाचणीवर खर्च करा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 26, 2020

🚨 पोलिसांच्या मृत्यू झाल्यावर 50 लाख रूपये देण्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या आरोग्यावर किंवा कोरोनाची चाचणीवर खर्च करा..

बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपये देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु, कोरोनामुळे मेल्यानंतर 50 लाख रूपये देण्यापेक्षा जीवंतपणी कोरोनाची चाचणी करा ना ?, कुटुंबप्रमुख मेल्यावर त्या पैशाचे करायचे काय ? असा संतप्त सवाल तमाम पोलिस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा संपर्क बाधित झालेल्या व्यक्‍तींशी जास्त असतो. तसेच सील झालेल्या वस्तीतील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुरक्षा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे म्हणून पोलिस कर्मचारीच पुढे जातात. त्यामुळे बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका जास्त आहे. राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू आल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपये मदतनीधी देण्याची घोषणा केली आहे.

या घोषणमुळे कुटुंबाला आधार होईल किंवा कुटुंबाचे कसे होईल? याचा प्रश्‍न मिटेल. परंतु, रेड झोनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांला कोरोना होऊन मृत्यू येण्याची वाट पाहण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी. जेणेकरून त्याच्यासह कुटुंबातील कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही. तसेच पोलिस ठाण्यातील अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनाही लागण होणार नाही. परंतु, शासन पोलिस कर्मचारी मरायची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी केला आहे. अनेकांनी वॉट्‌स ऍप ग्रूपच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्‍त केली आहे.

कोरोनाच्या दहशतीत जगतोय पोलिस..
कोरोनाचा रूग्ण आढळेल्या वस्तीला सील केल्यानंतर तेथे खाकी वर्दी रात्रंदिवस पहारा देते. वस्तीतील वातावरणात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पोलिसांकडे 20 रूपयांचे मास्क आणि सॅनिटायरची बाटली राहते. मात्र, ड्युटी संपल्यानंतर प्रत्येक पोलिस कर्मचारी काळजीत असतो. आपल्याला कोरोनाचा संसर्गचा लागण तर झाली नाही ना? असा प्रश्‍न स्वतःलाच पडतो. तो कुटुंबापासून अलिप्त राहतो, त्याचे सर्व सामान बाहेर ठेवतो. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे सर्व तो करीत असतो. यावरून तो दहशतीत जगत असल्याचे दिसत आहे.

राज्यभरातील पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची संसर्ग झाला. कोरोनामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यूसुद्धा झाला. तरीही पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने पाऊल उचलले नाही. दुर्लक्षित घटक असलेल्या पोलिसांना पीपीई किट, हेडशिल्ड, उच्च दर्जाचे सॅनिटायझर आणि अन्य साहित्य पुरविल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या मृत्यू झाल्यावर पैसे दिल्यापेक्षा जिवंतपणी त्यांची चाचणी करणे किंवा आरोग्यावर खर्च करणे शासनाकडून अपेक्षित आहे.

Post Bottom Ad

#

Pages