🚨विहिरीत सापडलेल्या ९ मृतदेहाचे गूढ उकलले ; अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 26, 2020

🚨विहिरीत सापडलेल्या ९ मृतदेहाचे गूढ उकलले ; अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड..

तेलंगणामधील वारंगलमध्ये विहिरीत आढळलेल्या ९ मृतदेहाच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून २ महिला आणि एका ३ वर्षाच्या मुलासह ९ जणांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. असे सोमवारी वारंगलचे सीपी व्ही.रवींदर यांनी सांगितले.

सी.पी. व्ही. रविंदर म्हणाले की,
मुख्य आरोपीची ओळख संजय कुमार झा च्या रूपात झाली आहे. त्याने अन्य तीन जणांच्या मदतीने ९ जणांचा बळी घेतला आणि त्यांचे मृतदेह शेतातील विहिरीत फेकले. बिहारच्या याकूब, मोहन आणि माणकोस यांच्या मदतीने संजयने या हत्या केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संजयने शेजारच्या बंगाली स्थलांतरित कुटुंबासह आणि इतर दोन बिहारी प्रवाशांची हत्या केली. गेल्या आठवड्यात, बुधवारी रात्री बंगाली कुटुंबप्रमुख मकसूद याने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रत्येकाला खाण्यामधून विष दिले गेले. नंतर हे सर्व ९ मृतदेह सुप्रिया कोल्ड स्टोरेजच्या आवारात असलेल्या विहीरीत टाकण्यात आले.
३ वर्षाच्या मुलाची आई तसेच घटस्फोटीत असलेली मकसूदची मुलगी बुशरा आणि संजय कुमार झा यांचे अवैध संबंध होते, परंतु अलिकडच्या काळात बुशराने मकसूदबरोबरच काम करणाऱ्या श्रीराम कुमार आणि श्याम कुमार या दोन अन्य बिहारी तरुणांशी संबंध ठेवले होते. बुशराच्या या वागण्यामुळे चिडलेल्या संजय कुमार झा याने मकसूदचे संपूर्ण कुटूंब तसेच ते दोन्ही बिहारी तरुण यांना मारण्याचा कट रचला. सध्या या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages