😱 वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून केले पलायन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 27, 2020

😱 वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून केले पलायन..

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मंगळवार दि. 26 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या तीन पैकी एका आरोपीने पोलिसांशी वाद घालून झटापट करत पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मुदल यांनी फिर्याद दिली आहे.

आकाश बाबुलाल पवार (वय २१, रा. आयप्पा मंदीराजवळ, काळेवाडी), गणेश ऊर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय १९ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नढेनगर काळेवाडी) आणि कृष्णा उत्तम सोनवणे (वय १९ रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तीनही आरोपींना गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, या गुन्ह्याखाली अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आणण्यात आले होते. त्यावेळी तीनही आरोपींनी पोलिसांशी वाद घालत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी कृष्णा सोनवणे आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश केंगार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages