😱 पुण्यात गुन्हेगारांमध्ये वर्चस्ववादावरून खूनाचे सत्र सुरू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 27, 2020

😱 पुण्यात गुन्हेगारांमध्ये वर्चस्ववादावरून खूनाचे सत्र सुरू..

फुरसुंगी गावातील गंगानगरमधील स्मशानभूमी येथे मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आईला कामावर सोडून घरी परत जात असतांना एका युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटने प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीं विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॅाकडाउनच्या काळातील हा तिसरा खून आहे. रमेश नाईकनवरे, शोएब शेख यांचा वर्चस्ववादातून यापूर्वी खून झाला होता.

बसवराज कांबळे (वय २७, रा.आष्टविनायक कॅालनी, फुरसुंगी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. कांबळे याच्यावर देखील हडपसर पोलिस ठाण्यात यापूर्वी शरिराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या आठवडयातील हा दुसरा खून आहे. गुन्हेगारांमध्ये वर्चस्वावरून वाद उफाळल्याने खूनाचे सत्र सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Post Bottom Ad

#

Pages