🚨लाॅकडाऊनमध्ये पोलिसांचे उल्लेखनीय कर्तव्य.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 27, 2020

🚨लाॅकडाऊनमध्ये पोलिसांचे उल्लेखनीय कर्तव्य..

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची लागण झाल्याने रूग्णांचा आकडा देखील वाढतोय. हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाकडून ४ लाख ३० हजार ६७० पास देण्यात आले आहे तर ५ लाख ६५ हजार ७२६ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. असे असले तरी पोलिसांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या २४८ घटना समोर आल्या आहेत. त्यात ८३० हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस विभागातील १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊन दरम्यान या फोनवर ९५ हजार ९११ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का देण्यात आला आहे, अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना क्वारंटाइन कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५ लाख ६५ हजार ७२६ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहेत.

लाॅकडाऊनमध्ये १ लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद..
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २२ मार्च ते २५ मे या लॉकडाऊन कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १५ हजार २६३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तर २३ हजार २०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages