🚨पुण्यात ५३ लाख ५९ हजारांचा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैद्यसाठ्यावर गुन्हे शाखेचा छापा ; एकास अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 28, 2020

🚨पुण्यात ५३ लाख ५९ हजारांचा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैद्यसाठ्यावर गुन्हे शाखेचा छापा ; एकास अटक..

पुणे शहरातील कोंढवा परीसरात होलसेल किराणा दुकानदाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राहत्या घरी आर्थिक नफा कमवीण्यासाठी देशी-विदेशी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैद्य साठा करुन ठेवल्याची माहिती मिळताच अंमली व खंडणी विरोधी पथक पुर्व विभाग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून देशी-विदेशी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ५३ लाख ५९ हजार ६५० रूपये किंमतीचा अवैद्यसाठा जप्त करत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैद्यसाठा करणारा हरीश पोकाराम चौधरी (वय २६, रा. महावीर रेसीडन्सी, कोंढवा ) असे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार दि.२७ मे रोजी अंमली व खंडणी विरोधी पथक पुर्व विभाग गुन्हे शाखा पुणे शहर यांना बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, महावीर रेसीडेन्सी, कोंढवा बुदुक, पुणे येथे होलसेल किराणा दुकानदार हरीश चौधरी नावाचा इसम देशी विदेशी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैद्य साठा करून तो त्याची वाजवी दरापेक्षा चढ्या दराने विक्री करीत आहे. अशी मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली व खंडणी विरोधी पथक पुर्व विभागाकडील मा.पोलीस निरीक्षक विजय टिकोळे व त्यांचा पथकातील पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकून हरीश पोकाराम चौधरी (वय २६, रा. महावीर रेसीडेन्सी, कोंढवा बुदुक, पुणे) यास ताब्यात घेत त्याच्या राहत्या फ्लॅटमधुन वेगवेगळ्या कंपनीचे देशी-विदेशी सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ५३ लाख ५९ हजारो ६५० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. देशी-विदेशी सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थाचा अवैद्य साठा करणारा हरीश चौधरी याच्या विरुध्द कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं ६९९/२०२० भा.द.वि.कलम १८८,२६९,२७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११ सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम ७(२),२०(२) प्रमाणे कोंढवा पो स्टे येथे गु र नं ६९९/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई,
मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री.बच्चन सिंह, मा.सहा.पोलिस आयुक्त अभियोग श्री.विजय चौधरी यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक पुर्व विभाग गुन्हे शाखा पुणे शहर कडील मा.पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, कर्मचारी प्रविण शिर्के, अर्जुन दिवेकर, सुशील काकडे, शिवाजी राहिगुडे, हेमा ढेबे, अमित छडीदार, योगेश मोहिते तसेच गुन्हे शाखा युनिट-२ कडील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहा पोलीस निरीक्षक जयवंत जाधव व त्यांचा स्टाफ यशवंत खंदारे, गोपाल मदने, विवेक जाधव यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages