🕉️ देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 29, 2020

🕉️ देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत..

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत अखेर तोडगा निघाल्याचं चित्र आहे. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं आहे. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाणार आहे.

पुण्यात आज अजित पवारांच्या उपस्थितीत वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एस टी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती याचा विचार करण्यात आला, तसेच पंढरपूर शहरातही कोरोना संसर्गाची लागण टाळण्याच्या दृष्टीने गांभीर्याने मुद्दे मांडले गेले, तसेच वारीची परंपरा कायम राहावे असाही प्रयत्न मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी वारी परंपरेत वाखरी येथे दरवर्षी संतांचे पालख्या एकत्र येतात ही परंपरा कायम ठेवली जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता पडल्यास बस, हेलिकॉप्टर, विमान अशा साधनांचा वापर करून पादुका वाखरीत पोहोचवल्या जातील दशमीच्या दिवशी या पालख्या वाखारीत पोहोचतील. आषाढी एकादशीच्या कालावधीत कोरोना संसर्गाची परिस्थिती कशी असेल यावर उर्वरित नियोजन केले जाईल.

वारी परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे.मात्र पायी वारी करण्याच्या अडचणी खूप असणार आहेत अनेक वारकऱ्यांना जिल्हे ओलांडून पंढरी पोहोचणे अडचणीचे ठरणार आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.हे लक्षात घेऊन परंपरा टिकावी यावर सर्वांचे एकमत झाले आहे.

वारकऱ्यांना पंढरपुरात पायी वारी करून पोचण्याच्या संदर्भात संसर्गाच्या भीतीने निर्णय घेणे शक्य नाही तरी आणखी सविस्तर निर्णय प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. आषाढी एकादशीला असलेला पुढील कालावधी पाहता परिस्थिती बदलली तर प्रसंगानुरुप निर्णय घेतले जातील.

Post Bottom Ad

#

Pages