🛅 तुळशीबाग मार्केट व महात्मा फुले मंडई १ जूनपासून सुरू करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाला तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे निवेदन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 30, 2020

🛅 तुळशीबाग मार्केट व महात्मा फुले मंडई १ जूनपासून सुरू करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाला तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे निवेदन..

राज्यात पुण्यातील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले तुळशीबाग मार्केट हे १ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने परवानगी मिळाल्यानंतर तुळशीबाग मार्केट पूर्ववत सुरू होणार आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे तुळशीबाग मार्केट हे गेल्या अडीच महिन्यापासून बंद होते.

तुळशीबाग मार्केटबरोबरच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडई ही सुद्धा १ तारखेपासून सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाय योजना राबवून मार्केट सुरू होणार आहे. तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

या पार्श्वभूमीवर तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी त्यांच्या दुकांनाची सामफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तर पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे ३०० दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरू करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहे.

दरम्यान तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात असून ग्राहकांचे तापमान देखील तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा एक तारखेपासून सुरु होणार आहे. यामुळे पुणेकरांची भाजीपाल्याची समस्या मिटणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages